महागड्या पार्लरची ट्रीटमेंट विसरा !

       त्वचा सुंदर आणि तजेलदार दिसावी यासाठी आपण अनेक महागड्या क्रीम्स आणि ब्युटी ट्रीटमेंट घेतो. पण याचा आपल्या चेहऱ्यावर विपरीत परिणाम होतो. ज्यामुळे पिंपल्स रॅशेस आणि डाग राहतात. पण आयुर्वेदानुसार हा एक पदार्थ त्वचेवर नियमितपणे लावल्यास डाग जाण्यास आणि मुरमे कमी होण्यास मदत करेल यासाठी काय करायला हवे हे जाणून घेऊया. जर आपल्या त्वचेवर खूप डाग आणि पिगमेंटेशन ची समस्या असेल तर तुटे बारीक करून त्याची पावडर बनवा. यात मुलतानी माती आणि गुलाब जल मिसळून चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावर दिसणारे काळे डाग आणि पिगमेंटेशन कमी होईल. ओपन पोअर्स आणि रखरखती त्वचेची समस्या असेल. मुरुमे आणि ब्लॅकहेड्समुळे त्रस्त असाल तर तुरटीचा वापर करा. यासाठी आपल्याला पाण्यात तुरटी भिजवून ३० ते ४० सेकंद चेहऱ्यावर घासून ध्या. यामुळे त्वचा घट्ट होण्यास मदत होईल. मुरुमाच्या समस्येसाठी तुरटीची पावडर बनवून त्यात कोरफडीचा गर घालून पेस्ट बनवा. या पेस्टने चेहऱ्यावर मसाज करा. त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत, जे चेहऱ्यावरील मुरुमे आणि त्यांचे डाग पूर्णपणे काढून टाकण्यास मदत करते. शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात थोडीशी तुरटी घालू शकता. यामुळे शरीराची दुर्गंधी कमी होते.तुरटी विरघळवून कापसाच्या मदतीने काखेत किंवा दुर्गंधी असलेल्या ठिकाणी लावू शकता. यामुळे वास कमी होऊ शकतो.  

Comments

Popular posts from this blog

Relationship goals for a long-term happy partnership

Oily Skin Care: A Balancing Act

7- Day Digital Detox plan