नीता अंबानींनी घरच्या घरी केले होते तब्बल 18 किलो वजन कमी, सकाळी 'हे' खास पाणी पिऊन 62 वयातही राहतात फिट व तरूण
जगात अनेक यशस्वी स्त्रिया आहेत, पण काही व्यक्ती आपल्या कर्तृत्वासोबतच जीवनशैलीमुळेही आदर्श ठरतात. वय वाढलं की ऊर्जा कमी होते, वेळ कमी पडतो आणि स्वतःकडे लक्ष देणं मागे पडतं. पण काहीजणी या कल्पनांना पूर्णतः छेद देतात आणि आपली जीवनशैलीच प्रेरणादायी बनवतात. देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी हे असचं एक नाव. ६० वर्षांचा टप्पा पार करूनही त्यांचा ताजेतवानेपणा आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व पाहून कोणालाही कुतूहल वाटेल की, यामागचं रहस्य तरी काय आहे. काम, घर आणि समाजसेवा या सगळ्यांचा समतोल साधताही त्या स्वतःच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देतात.
त्यांची त्वचा, शारीरिक लय आणि मानसिक संतुलन हे सर्व अगदी परफेक्ट दिसतं. लाखो महिलांसाठी प्रेरणादायी असलेली ही फिटनेस जर्नी साधी असली तरी सातत्य आणि निष्ठा हे तिचं मूळ. चला तर मग जाणून घेऊया नीता अंबानींच्या तंदुरुस्तीमागील मुख्य नियम कोणते आहेत.
सक्रिय दिवसाची सुरुवात
नीता अंबानी आपला दिवस खूप लवकर सुरू करतात. सकाळच्या वेळेला शरीर आणि मन दोन्ही सर्वात जास्त ताजेतवाने असतात, त्याचा त्या जास्तीत जास्त फायदा घेतात. उठताच सुमारे ४० मिनिटांचा शारीरिक व्यायाम हा त्यांचा नित्यक्रम. यात कधी स्विमिंग , कधी चालणे तर कधी स्टे्रचिंगचा समावेश असतो. स्ट्रेचिंग केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारते आणि दिवसभर ऊर्जा टिकवते. कामाच्या ताणाखालीही त्या कधीही याकडे दुर्लक्ष करत नाहीत. सातत्य हेच त्यांचं मोठं बळ आहे. यानंतर त्या रिकाम्या पोटी ताजा भाज्यांचा किंवा फळांचा रस आणि ग्रीन टी घेतात.
व्यायामानंतर त्या न्याहारीत अंडी किंवा आम्लेट, सुका मेवा आणि सोबत ग्रीन टी किंवा ताज्या फळांचा रस पितात. दिवसाची सुरुवात प्रथिनांनी आणि पोषक घटकांनी करण्यावर त्यांचा विश्वास आहे. सकाळी योग्य पोषण दिल्यास शरीर दिवसभर मजबूत काम करतं आणि अनावश्यक खाण्याची गरज कमी होते
संतुलित आणि घरगुती अन्नाची निवड
नीता अंबानी शाकाहारी आहार घेतात. आलिशान जीवन असूनही त्यांच्या जेवणात घरगुती आणि साध्या अन्नाला प्राधान्य. दुपारी पचायला हलका आहार घेतात. संध्याकाळी फळं किंवा हलके पदार्थ. दिवसभर मुबलक पाणी पिणं त्यांच्यासाठी अतिशय आवश्यक भाग. ऋतूनुसार आहार घेतल्याने शरीरावर चांगला परिणाम होतो आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते.
मानसिक आरोग्यासाठीही व्यायाम
नीता अंबानी नेहमी महिलांना सांगतात की आरोग्य म्हणजे फक्त बाह्य सौंदर्य नाही. वयानुसार स्नायूंची ताकद कमी होणं स्वाभाविक पण मनातील उत्साह कमी होऊ नये. योग, ध्यान आणि चालण्याने तणाव कमी होतो, मन शांत राहते आणि झोप चांगली लागते. व्यायाम हा शरीर आणि मनासाठी तितकाच महत्त्वाचा घटक आहे, हा संदेश त्या सातत्याने देतात.
Comments
Post a Comment